Saturday, 29 April 2017

*हुंडा प्रथेचे मूळ कशात आहे ?*

*हुंडा प्रथेचे मूळ कशात आहे ?*

*कन्यादान* :- कन्यादान नावाचा प्रकार या देशात फार पूर्वीपासून चालत आलेला. *सिंधु संस्कृतीत कन्यादान नावाची पद्धत अस्तित्वात नव्हती.* दान हे एखाद्या वस्तूचे , धान्याचे किंवा मानवेत्तर ( प्राणी , जनावर )यांचे दिले जाते .

*मुलगी हि काही दान देण्याची वस्तू नाही.* ती सुद्धा माणूस आहे .

पण या देशातील वैदिक व्यवस्थेने आणि त्यांच्या धर्मग्रंथांनी स्त्री ला सर्व प्रथम गुलाम केले. तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. तिचा व्यापाराची वस्तू म्हणून वापर होऊ लागला.

*हिंदू धर्मग्रंथ, वेद, पुराणे यात असे उल्लेख आढळतात. पुरुषसूक्ताच्या कलमांनी तर स्त्रीच्या चारित्र्याची टिंगल केली आहे. महाभारतात पांडवांनी आपल्या पत्नीला दौपदीला जुव्यावर मांडले होते. उपस्थित सभागृहासमोर तिचे वस्त्रहरण झाले.*

*स्त्रियांना या जाचक व्यवस्थेतून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी प्रथम त्यांची निंदा करणाऱ्या, त्यांना कमी लेखणाऱ्या आणि त्यांना व्यापाराची , जुगाराची वस्तू समजणाऱ्या धर्मव्यवस्थेला नकार द्यावा लागेल.*

स्त्रियांचा अपमान करणाऱ्या धर्मातून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी व्यवस्थेशी झगडावे लागेल. *स्त्री जीवनाचा अपमान करणारे धर्मग्रन्थ जाळावे लागतील.* त्यासाठी मनाचा निग्रह करण्याची या देशातील स्त्रियांची तयारी असली पाहिजे.

हा देश तर स्वतंत्र झाला पण या देशातील स्त्रिया अजूनही या देशातील धर्मव्यवस्थेच्या, संस्कृतीच्या आणि प्रथा-परंपरांच्या गुलाम आहेत. *स्त्रियाच स्त्रियांना या गुलामीतून बाहेर काढू शकतात.*

*हुंडा* :- हुंडा हा व्यवस्थेचा फक्त एक भाग आहे. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्त्रियांचा अपमान करते . तिला दुबळे समजते. हुंडा हा तिला आयुष्यभर पोसण्यासाठी दिली जाणारी लाच आहे.

स्त्रियांनी याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कोणताच चित्रपट नाटक क्रान्ती करू शकत नाही. चित्रपट , नाटक हे व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा नक्कीच देऊ शकतात. पण *स्त्रियांना पुरुषसूक्ताच्या, वैदिक व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी धर्मग्रंथांची चिकित्सा केली पाहिजे.*

*त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या धर्माला आणि धर्मग्रँथांना नकार दिला पाहिजे. त्यासाठी स्त्रियांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.*

जो धर्म स्त्रियांना वस्तू समजतो तो धर्म स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ शकत नाही. स्त्रियांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी धर्माची चिकित्सा करून तिला गुलाम करणाऱ्या व्यवस्थेतून बाहेर पडले पाहिजे.....

हुंडा देणे हा गुन्हा आहे की नाही या वादात मी पडणार नाही. कारण ती ती त्या गरीब बिचाऱ्या बापाची अडचण सुद्धा असू शकते. परंतू हुंडा घेणे हा मात्र जबर गुन्हा आहे. *हुंडा घेणारे आणि हुंड्यासाठी लग्न करणारे लोक कसायाची औलाद असतात असे माझे स्पष्ट मत आहे.*

लोभी , लालची लोकांना आपण जी मागणी करतोय त्यामुळे एखाद्याचे कुटुंब सुद्धा बर्बाद होऊ शकते याची जरा सुद्धा लाज वाटत नाही. *उलट माझा मुलगा अमूक इतका शिकला म्हणून जास्त पैसा उकळण्याचा हा खंडणीचा पारंपरिक प्रकार आहे.*

आणि त्याला  *"कन्यादान"* नावाच्या गोड नावाखाली आणि संस्कृती संस्कृती असा दांडोरा पिटत खपवले जाते. हि कुठली सडकी संस्कृती.

*धर्माच्या ठेकेदारांनो भलेही तुमची वेद, पुराणे विवाह एक संस्कार या नावाखाली कन्यादानाचे समर्थन करत असेल तर लक्षात घ्या की , स्त्री ही काही दान देण्यासाठी ती वस्तू नाही ती सुद्धा एक जीव आहे.*  तिला सुद्धा भावना आहेत . मन आहे . बुद्धी आहे . स्त्रियांना गुलाम करण्याचा हे एक पूर्वापार चालत आलेले वैदिक व्यवस्थेचे षड्यंत्र आहे .
     
स्त्रियांना पुरुषां इतकीच बुद्धिमत्ता आहे . मग हे कन्यादान आणि हुंड्याचे लफडे कशासाठी ? मुलीला आयुष्यभर पोसण्याची किंमत वसूल करणे म्हणजे हा नीच प्रकार म्हणजे हुंडा होय.

आपली असली नसली दोन-चार एकर जमीन विकून कोणता बाप सुखी होत असेल . (हे यांचा देवच जाण)

*अगोदरच नापिकी, सरकारचे चुकीचे पीक धोरण, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे.*

त्यातच मराठवाड्यातील शीतल नावाच्या आपल्या बहिणीने हुंड्याचे कारण सांगून आत्महत्या केली आहे . तिने आपले प्राण देऊन आपल्या वडिलांची कर्जातून तर सुटका केली असेल पण हुंडा घेणाऱ्या लाखो-करोडो बापांना त्यांच्या दरिद्री बुद्धीचा, मानसिकतेचा आणि विचारसरणीचा परिचय करून दिलेला आहे .

*जेवढा जास्त हुंडा तेवढी जास्त प्रतिष्ठा हा एक गैरसमज समाजात पसरलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त पैसा उकळण्याचा मुलाचा , त्याच्या बापाचा आणि एकूण परिवाराचा हा प्रयत्न असतो.*

मुळात ज्यांच्या मनगटात दम नसतो असे लोक हुंड्याची मागणी करतात .

*हुंडा घेणे हे गांडुपणाचे लक्षण आहे यात कुठली प्रतिष्ठा नाही की सन्मान नाही. हुंडा घेणारे एकप्रकारे आपल्या पोराला एकप्रकारे पैसे घेऊन विकून टाकतात. जनावरांची खरेदी विक्री होते पण मुलाचा बाप प्रतिष्ठेच्या खोट्या कारणासाठी म्हणा किंवा लोभपोटी म्हणा आपल्या पोराला विकून टाकतो.*

मुली कडच्यांची हुंडा द्यायचा आणि मुलाकडच्यांनी तो लुटायचा / लाटायचा याचा अर्थ काय ? यात शहाणपणा कुठलाच नाही उलट गाढवपणा आहे .

शीतल ताईने आत्महत्या करण्या अगोदर जी चिठ्ठी लिहून ठेवली ती या खंडणी बहाद्दर व्यवस्थेला आणि सर्व मुलाच्या बापांना सवाल करून जाते की तुमचा धर्म , तुमचे विवाह संस्कार हे सगळं थोतांड आहे. धर्माच्या , विवाह संस्काराच्या नावाखाली जर मुलींवर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर त्या देशातील समाजव्यवस्थेची काय स्थिती असेल ? याचा विचार करून बघा .

*आणि कशाला आमची संस्कृती किती महान म्हणून सारखा दांडोरा पिटता ? काय आहे तुमची संस्कृती ? काय आहे तुमचा धर्म ? जगातील सर्वात लुच्चा धर्म हा तुमचा आहे.*

वैदिक व्यवस्थेच्या ठेकेदारांनो सर्वात नीच संस्कृती तुमची आहे. ज्या देशात संस्कार, धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली तुम्ही राजकारण करता तो देश सुसंस्कृत कसा? अण्णाभाऊ साठे म्हणाले होते स्वातंत्र्य हे कोणत्या गाढविणीचे नाव आहे ? मी थोडा त्यात बदल करून म्हणेल या देशातील धर्म आणि त्याचे धर्मगुरू , उघडे नागडे साधू हे खरे बदमाश आणि लफंगे आहे . या देशातील धर्म माणसाला माणूस म्हणून जगण्याची परवानगी देत नाही .

*माणसा-माणसात भेद करते . झगडे लावते . हा कसला धर्म ? हि कुठली संस्कृती ?*

या धर्मामुळे आणि त्यांच्या रिती-भातीमुळे शितलला आत्महत्या करावी लागली. हे सत्य आहे .

धर्माच्या ठेकेदारांना आणि संस्कृतीच्या पुजाऱ्यांना त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती किती नीच आहे हे बलिदान देण्यापूर्वी ठणकावून सांगितले आहे.

जोपर्यंत या देशातील स्त्रिया स्वतः रस्त्यावर उतरून या धर्मव्यवस्थे विरुद्ध आवाज उठवणार नाही .

*लग्नातून ब्राम्हण-भटजी आणि त्यांची व्यवस्था हद्दपार करणार नाही तोपर्यंत या देशातील स्त्री स्वतंत्र होणार नाही.*

तिच्याकडे माणूस म्हणून बघितले जाणार नाही . हे जर झाले नाही तर अश्या हजारो -लाखो शीतल आत्महत्या केल्यावाचून राहणार नाहीत....

*स्त्रियांनी स्त्रियांच्या मानसिक-सांस्कृतिक-आर्थिक-धार्मिक स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे.*

मुलगी

"😘"✍ *मुलगा :*🙎🙎
.
*8 वर्ष:* पप्पा मला रिमोट कंट्रोल कार घेऊन द्या.
(इच्छा पुर्ण)
.

*11 वर्ष :* पप्पा मला 200/- चा पार्कर पेन पाहिजे.
(इच्छा पुर्ण)
.

*17 वर्ष :* पप्पा मला स्पोर्टस् बाईक पाहिजे.
(इच्छा पुर्ण)
.
.

*21 वर्ष :* मला तुमची प्राॅपट्री पाहिजे.
(इच्छा पुर्ण)
.
.

*25 वर्ष :* मला तुम्ही या घरात नको आहात.
(इच्छा पुर्ण...)

.
.

☺✍ *मुलगी :* 👧👧
*8 वर्ष :* पप्पा मला तुमच्या सोबत वेळ घालवायचा आहे.
(पप्पांना वेळ नाही)
.
.

*11 वर्ष :* पप्पा मला तुमच्या सोबत खेळायचे आहे.
(पप्पांना वेळ नाही)
.
.

*17 वर्ष :* पप्पा मला तुमच्या सोबत फिरायला जायचे आहे.
(दुर्लक्ष)
.
.

*21 वर्ष :* (लग्नाच्या वेळी)
मला तुम्हाला सोड़ुन नाही जायचे.
(ते शक्य नाही)
.
.

*25 वर्ष :* पप्पा तुम्ही माझ्या सोबत रहायला या.....
(इच्छा पुर्ण)
कारण आता पप्पांना कळुन चुकलंय की मुलगी आपली आणि मुलगा परका असतो...
.
.

भाग्यवान आहेत ज्यांना मुली आहेत...
.
.

आणि देव अशाच लोकांना मुली देतो जे भाग्यवान असतात...
.
.

मुली या देवाने बनवलेली आणि दिलेली सगळ्यात सुंदर भेट आहे.
.
त्यांचा आदर करा..!!!
.आवडल तर नक्की पाठवा "💌"👇"👌👍