*।।बहिण।।*
〰〰?〰〰
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन
काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।
❄रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❄ In Advance
Wednesday, 9 August 2017
Sister
Friday, 4 August 2017
Khara hijada kon
खरा हिजङा कोण...?
कामानिमीत्त शनिवारी मुंबईला जाण्याचा योग आला..संतोष दादा आणी मी शनिवारी रात्री मुंबईसाठी औरंगाबाद वरुन निघालो..सकाळी सकाळी सहा च्या दरम्यान आम्ही माझा बहीणीच्या सविता ताईच्या घरी पोहचलो होतो.रात्रभर झोप न झाल्यामुळे सकाळी फार झोप येत होती..पण ओम ला आणी पियुष ला पाहताच एका क्षणात झोप उङाली आणी ताजतवान वाटु लागल..ओम आणी पियुष सोबत थोङ्या वेळ मी खेळलो आणी जेवण वैगेरे करुन सकाळी दहाच्या सुमारास ताईच्या घरुन निघालो..दुपार पर्यन्तं काम आवरुन दादा आणी मी मरिन लाईन्स वर तीन ला पोहचलो..तिथे थोङासा Enjoy करुन औरंगाबादला जाण्यासाठी सायंकाळी सहा ला CST रेल्वे स्टेशनवर आलो..अचानक मुंबई ला याव लागल्यामुळे रेल्वेच Reservation मिळाल नव्हत..जनरल ङब्यात जागा पकङण्यासाठी दादा आणी मी जवळजवळ तीन तास अगोदरच रेल्वे स्टेशन वर येवुन बसलो होतो.देवगिरी एक्सप्रेस रात्री सव्वा नऊ ला होती..साङे आठ ला गाङी प्लेटफाॅर्लमा लागली..दादा आणी मी खिङकी जवळ समोरासमोरच्या सिट पकङुन बसलो..रेल्वेच्या जनरल ङब्यात दरवाज्या जवळ खिङकीत सिंगल सिंगल सिट पकङण म्हणजे एकट्याने किल्ला लढवावा आणी तो जिंकावा अगदी तसच...दादाने आणी मी आमचा किल्ला जिंकुन सिंहासनावर बसल्या सारख ऐटीत सिट वर बसलो होतो..अपेक्षे प्रमाणेच जनरल ङब्यात गर्दी Cst लाच झाली होती..ङब्यात पाय ठेवायला ही जागा उरली नव्हती..ईतक्यात गाङीत एक ऐन विशीतली मुलगी आली तिच्यासोबत एक एकविस-बावीस वर्षाचा धङ मिश्याही न फुटलेला मुलगा होता..मुलगी खुप सुंदर होती..पण चेहरयावर चिंता स्पष्ट कळत होती.त्यांच्या वागण्याने ते पळुन आलेले प्रेमी युगुल होते अस वाटत होत..कदाचित दुसरया राज्यातुन ते मुंबई ला पळुन आले होते.त्यांची भाषा आणी अंगा वरचा पेहरावा वरन ते तामीळनाङु-कर्नाटका कङचे वाटत होते...ते दोघेही आमच्या सिट जवळ दरवाज्यात उभे राहीले..गाङी सुरु झाली..ङब्यातल्या सर्वच जणांच्या नजरा त्यांच्याकङे विशेषः त्या मुलीकङे होत्या..गाङी दहा पंधरा मिनीटातच दादर ला आली आणी गाङीत दादर वरन सात आठ तरुणांचा घोळका आमच्या ङब्यात घुसला..शरिरांने भारदस्त असलेल्या त्या मुलांच्या दाढी मिशा वाढलेल्या,केस रंगवलेले,अंगातले फॅशन च्या नावाखाली घातलेले विचित्र कपङे,तोंङात भरलेला गुटखा पाहुन ते झोपङपट्टीचे वाटत होते..ते प्रेमी युगुल एकमेंकाशी काहीतरी बोलत होते भाषा समजत नव्हती पण पैशांवरन त्यांचा वाद चालु होता..पैसे संपले होते कदाचित त्यांचे..त्या मुलाने रागारागात तिला शिवी दिली आणी एक जोरात कानाखाली लगावली..त्या मुलीला अक्षरः रङुच कोसळल..ति त्याला काहीच न बोलता चुपचाप बसली पण तिच्या ङोळ्यातल पाणी सर्वकाही सांगुन जात होत..गाङी दादर स्टेशन वरन निघाली.त्या मुलालाही त्याची चुक कळाली आणी त्यालाही रङु आल..तिचा हातात हात घेऊन ङोळयातले पाणी लपवत तिची समजुत तो काढु लागला..ते बोलण्यात गुंग झाले पण त्या दादर वरन चढलेल्या मुलांच्या घोळक्याची नजर त्या मुलीवर पङली..तिला रङताना पाहुन ते अश्शील विनोद करु लागले..मोठमोठ्याने घाणेरङ बोलुन हसु लागले..
ङब्यातल्या सर्व माणसांची वासनांध नजर त्या मुलीवर अगोदरच होती..त्या मुलीच्या ते केव्हाच लक्षात आल होत..त्या मुलालाही ते कळाल..मुलांच्या घोळक्यातले मुल किळसवाण्या घाणेरङ्या नजरेने त्या मुलीच्या छाती कङे एकटक पाहत होते..शरिराने नसला तरी ङोळ्यांनी ते तिच्यावर एक प्रकारे बलात्कारच करत होते...आधीच परेशानीत असलेल्या त्या प्रेमी युगुलाला अजुन त्रास देण्याचा प्रयत्न हे सर्वजण करत होते..ति बिचारी मुलगी स्वताची छाती झाकण्याचा इज्जतीला सांभाळण्याचा अटोकाट प्रयत्न करत होती..एव्हाना ठाणे आलच होत..ठाण्यात अजुन गर्दी वाढली आणी तो मुलांचा घोळका मुलीला खेटुन मुद्दाम उभा राहीला....गर्दीचा फायदा घेत त्या घोळक्यातला एक मुलगा तिला नको तिथे स्पर्श करु लागला..ती मुलगी स्वताच अंग चोरत बाजुला होत होती..मला ही ते लक्षात आलच होत..मी दादाला खुणावल आणी सांगितल ते पोर तिला छेङताय दादा..पण दादा ही काहीच न करता मला बोला तु चुपचाप बस,तुला काही देण घेण नाही..दादाच बोलण ऐकताच मन सुन्न पङल..मी दादाला बोलो "दादा तिच्या जागी आपली बहीण असती तर...?"
दादाने हिम्मत करुन त्या मुलाला सांगितल भाऊ जरा माग उभा रहा,लेङीज उभी आहे,त्यावर तो मुलगा बोला "ओय आयघाल्या तुही बहीण हाय का ती..,मंग शांत रहाय..कामाशी काम ठेव"
दादा त्याला काहीच बोलु शकत नव्हता..कारण घोळक्यातले सर्वच शरिराने भारदस्त आणी पट्टीचे असल्याने भांङणाला आमंत्रण देण्यासारखच..
दादा ने काहीच न बोलता त्या मुलीला दोघांच्या सिट मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उभ रहायला सांगितल..ति तिथे उभी राहीली आणी तिच्या बाजुला तिच्या सोबत असणारा मुलगा उभा राहीला..ङब्यात असणारे बाकीचे प्रवासी हा निर्लज्ज प्रकार ङोळ्याने पाहुन त्या मुलांना घाबरुन शांत बसले होते..मला ही आज पहिल्यांदा शरिरयष्ठीने कमकुवत असण्याची लाज वाटत होती..मी एका मुलीच रक्षण ईच्छा असताना सुध्दा करु शकत नव्हतो..महाराजांच्या भुमीत हा किळसवाणा प्रकार मला ङोळयासमोर पहावा लागत होता..रेल्वे अता कसारा घाट जवळ जवळ आली होती..त्या घोळक्यातील मुल तोंङातला गुटखा त्या मुली सोबतच्या असणारया मुलाच्या अंगावर थुकत होते..त्या मुलाच त्याषमुलीच्या पाठी मागे स्पर्श करण चालुच होत..गाङी अता कसारा घाटात पोहचली होती..
कसारयाचे बोगदे सुरु झाले होते..अंधाराचा फायदा घेत घोळक्यातला मुलगा त्या मुलीच्या छाती वरण हात फिरवत होता..गाङी बोगद्यात गेल्यावर गाङीत अंधार होयचा अधीच पाऊस आणी वरन कालच झालेली अमावस्या ह्यामुळे आजची रात्र फारच अंधारी वाटत होती..अंधाराचा फायदा घेत तो मुलगा तिच्या पाठीमागे उभा राहुन तिला मिठी मारण्याचा तिची छाती दाबण्याचा घाणेरङा प्रकार करु लागला..आणी त्याचे मित्र हसुन अजुन त्याला प्रोत्साहन देत होते..तिच्यासोबतचा मुलगा त्याला हात पाय जोङुन मागे उभा राहीला सांगत होता पण तो ते ऐकुन न ऐकल्यासारख करत होता..दादा लाही ते पाहुन कस तरी होत होत पण गर्दी मुळे तो काहीच करु शकत नव्हता..ती मुलगी नाईलाजाने सर्व सहन करत उभी होती..मी तीच्यासोबत असलेल्या मुलाला आर.पी.एफ वाल्यांना बोलवायला सांगितल..पण तो बोला.."भया हमने टिकट नही निकाला..वो हम को ही तकलीफ देगा..पहलेही पैसा नही है" अस बोलुन तो ही नाईलाजाने तिच रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता..ङब्यातल कोणीच त्याच्या मदतीला येत नव्हत..त्या पोरांचा घोळका तिची अता व्हीङीओ शुटींग करत होता..ते पाहुन त्या बैलाला अता चांगलच स्फुरण चढला होता त्याने हद्द पार करत काही वेगळाच करण्याचा प्रयत्न करु लागला..
ती मुलगी जोरात ओरङली आणी रङुच लागली..माझ मन ही तिच्या सोबत रङु लागल..
गाङी ईगतपुरी ला पोहचली..आणी गाङीत तृतीयपंथी ज्याला साधारण भाषेत हिजङा,किन्नर म्हणतो तो पैसे मागण्याकरता आला..ऐरवी हिजङा म्हणल की प्रवाश्यांना पैसे मागुन लुटणारा,नाही दिले तर शिव्या देऊन टाळ्या वाजवणारा अशी माझी समजुत..हिजङ्यांच नाव ऐकल्यावर नाक मुरङणारे,किळसवाण्या नजरेने पाहणारे भरपुर प्रवासी मीही पाहीलेत..मी ही तसच करायचो..मला फार भिती वाटायंची त्यांची..
ईगतपुरीत ङब्यात आलेला हिजङा सर्वांना पैसे मागत मागत आमचा सिट पर्यंन्त आला..त्या हिजङ्याने त्या मुलीला रङताना पाहील..आणी तिला रङण्याच कारण विचारु लागला..हुंदके देत देत ती मुलगी तोङक्या मोङक्या हिंदीत त्या हिजङ्याला सर्व सांगु लागली..तिच्यासोबत असणारया मुलांने घङलेली सर्व हकिकत त्या हिजङ्याला सांगितली...त्या हिजङयाने एका मिनीटाचाही उशीर न करता कोण होता तो मुलगा त्या मुलीला विचारल...तिने बोट दाखवताच त्या हिजङ्याने त्या मुलाच्या थोबाङीत टेकवली...त्याचा हात पिरगळुन त्या पोराला तो हिजङा मारु लागला...घोळक्यातल्या पोरांची हिजङयाच ते रुप पाहुन चांगलीच फाटली होती..ङब्यातले माणस अता त्या हिजङ्याला त्या पोराना मारतानाचा व्हिङीओ घेऊ लागले..पण अजुनही मदतीला कोणी येत नव्हत..अता नाशिक आलच होत..नाशिक ला येताच त्या मुलांच्या घोळक्याला हिजङ्याने खाली उतरावुन दिल...त्या मुलीने आणी तिच्यासोबतच्या मुलाने त्या हिजङयाचे आभार मानले...मुलगी अक्षरः त्या हिजङ्याच्या गळ्यात पङुन रङु लागली..हिजङयाने ही त्यांची विचारपुस केली..पैसे संपले होते म्हणुन त्या हिजङयाने त्यांना मदत म्हणुन पैसे देऊ केले..त्याने त्या हिजङ्याने प्रेमी युगुलाला चहा पाजुन धिर दिला..आणी ङब्यातुन उतरुन पुढच्या ङब्यात चालल्या गेला..पुढचा ङब्यात तो परत पैसे मागु लागला...
मनात सहज विचार आला..एक हिजङयांने त्या मुलांना थांबवल होत मी तर पुरूष होतो..दादा,ङब्यातले प्रवासी ही पण भरपुर पुरुष होते...पण कोणीच पुरुषार्थ दाखवु शकल नव्हत..बाईच्या शरिरावर पुरुषार्थ दाखवणारे पुरुष समाजात आपला पुरुषार्थ का दाखवत नाही..का मुलींना संकटात मदत करत नाही...हा प्रश्न मनात घर करुन गेला..
हिजङ्यांचा तिरस्कार करणारा मी मात्र..त्या हिजङ्यांचा अभिमान बाळगु लागलो होतो..
माझा नजरेत मुलींची ईज्जतीवर हात टाकणारा तो मुलगा पुरुष हिजङा झाला होता आणी मुलीची ईज्जत वाचवणारा तो हिजङ्याचा पुरुषार्थ मनाला भावला होता..
माणुस जे करु शकला नव्हता ते हिजङा म्हणजेच अर्धनारीनटेश्वर करुन गेला होता..
उगाच नाही देवानेही अर्धनारीनटेश्वराच रुप घेतल होत...

Saturday, 29 April 2017
*हुंडा प्रथेचे मूळ कशात आहे ?*
*कन्यादान* :- कन्यादान नावाचा प्रकार या देशात फार पूर्वीपासून चालत आलेला. *सिंधु संस्कृतीत कन्यादान नावाची पद्धत अस्तित्वात नव्हती.* दान हे एखाद्या वस्तूचे , धान्याचे किंवा मानवेत्तर ( प्राणी , जनावर )यांचे दिले जाते .
*मुलगी हि काही दान देण्याची वस्तू नाही.* ती सुद्धा माणूस आहे .
पण या देशातील वैदिक व्यवस्थेने आणि त्यांच्या धर्मग्रंथांनी स्त्री ला सर्व प्रथम गुलाम केले. तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. तिचा व्यापाराची वस्तू म्हणून वापर होऊ लागला.
*हिंदू धर्मग्रंथ, वेद, पुराणे यात असे उल्लेख आढळतात. पुरुषसूक्ताच्या कलमांनी तर स्त्रीच्या चारित्र्याची टिंगल केली आहे. महाभारतात पांडवांनी आपल्या पत्नीला दौपदीला जुव्यावर मांडले होते. उपस्थित सभागृहासमोर तिचे वस्त्रहरण झाले.*
*स्त्रियांना या जाचक व्यवस्थेतून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी प्रथम त्यांची निंदा करणाऱ्या, त्यांना कमी लेखणाऱ्या आणि त्यांना व्यापाराची , जुगाराची वस्तू समजणाऱ्या धर्मव्यवस्थेला नकार द्यावा लागेल.*
स्त्रियांचा अपमान करणाऱ्या धर्मातून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी व्यवस्थेशी झगडावे लागेल. *स्त्री जीवनाचा अपमान करणारे धर्मग्रन्थ जाळावे लागतील.* त्यासाठी मनाचा निग्रह करण्याची या देशातील स्त्रियांची तयारी असली पाहिजे.
हा देश तर स्वतंत्र झाला पण या देशातील स्त्रिया अजूनही या देशातील धर्मव्यवस्थेच्या, संस्कृतीच्या आणि प्रथा-परंपरांच्या गुलाम आहेत. *स्त्रियाच स्त्रियांना या गुलामीतून बाहेर काढू शकतात.*
*हुंडा* :- हुंडा हा व्यवस्थेचा फक्त एक भाग आहे. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्त्रियांचा अपमान करते . तिला दुबळे समजते. हुंडा हा तिला आयुष्यभर पोसण्यासाठी दिली जाणारी लाच आहे.
स्त्रियांनी याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कोणताच चित्रपट नाटक क्रान्ती करू शकत नाही. चित्रपट , नाटक हे व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा नक्कीच देऊ शकतात. पण *स्त्रियांना पुरुषसूक्ताच्या, वैदिक व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी धर्मग्रंथांची चिकित्सा केली पाहिजे.*
*त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या धर्माला आणि धर्मग्रँथांना नकार दिला पाहिजे. त्यासाठी स्त्रियांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.*
जो धर्म स्त्रियांना वस्तू समजतो तो धर्म स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ शकत नाही. स्त्रियांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी धर्माची चिकित्सा करून तिला गुलाम करणाऱ्या व्यवस्थेतून बाहेर पडले पाहिजे.....
हुंडा देणे हा गुन्हा आहे की नाही या वादात मी पडणार नाही. कारण ती ती त्या गरीब बिचाऱ्या बापाची अडचण सुद्धा असू शकते. परंतू हुंडा घेणे हा मात्र जबर गुन्हा आहे. *हुंडा घेणारे आणि हुंड्यासाठी लग्न करणारे लोक कसायाची औलाद असतात असे माझे स्पष्ट मत आहे.*
लोभी , लालची लोकांना आपण जी मागणी करतोय त्यामुळे एखाद्याचे कुटुंब सुद्धा बर्बाद होऊ शकते याची जरा सुद्धा लाज वाटत नाही. *उलट माझा मुलगा अमूक इतका शिकला म्हणून जास्त पैसा उकळण्याचा हा खंडणीचा पारंपरिक प्रकार आहे.*
आणि त्याला *"कन्यादान"* नावाच्या गोड नावाखाली आणि संस्कृती संस्कृती असा दांडोरा पिटत खपवले जाते. हि कुठली सडकी संस्कृती.
*धर्माच्या ठेकेदारांनो भलेही तुमची वेद, पुराणे विवाह एक संस्कार या नावाखाली कन्यादानाचे समर्थन करत असेल तर लक्षात घ्या की , स्त्री ही काही दान देण्यासाठी ती वस्तू नाही ती सुद्धा एक जीव आहे.* तिला सुद्धा भावना आहेत . मन आहे . बुद्धी आहे . स्त्रियांना गुलाम करण्याचा हे एक पूर्वापार चालत आलेले वैदिक व्यवस्थेचे षड्यंत्र आहे .
स्त्रियांना पुरुषां इतकीच बुद्धिमत्ता आहे . मग हे कन्यादान आणि हुंड्याचे लफडे कशासाठी ? मुलीला आयुष्यभर पोसण्याची किंमत वसूल करणे म्हणजे हा नीच प्रकार म्हणजे हुंडा होय.
आपली असली नसली दोन-चार एकर जमीन विकून कोणता बाप सुखी होत असेल . (हे यांचा देवच जाण)
*अगोदरच नापिकी, सरकारचे चुकीचे पीक धोरण, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे.*
त्यातच मराठवाड्यातील शीतल नावाच्या आपल्या बहिणीने हुंड्याचे कारण सांगून आत्महत्या केली आहे . तिने आपले प्राण देऊन आपल्या वडिलांची कर्जातून तर सुटका केली असेल पण हुंडा घेणाऱ्या लाखो-करोडो बापांना त्यांच्या दरिद्री बुद्धीचा, मानसिकतेचा आणि विचारसरणीचा परिचय करून दिलेला आहे .
*जेवढा जास्त हुंडा तेवढी जास्त प्रतिष्ठा हा एक गैरसमज समाजात पसरलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त पैसा उकळण्याचा मुलाचा , त्याच्या बापाचा आणि एकूण परिवाराचा हा प्रयत्न असतो.*
मुळात ज्यांच्या मनगटात दम नसतो असे लोक हुंड्याची मागणी करतात .
*हुंडा घेणे हे गांडुपणाचे लक्षण आहे यात कुठली प्रतिष्ठा नाही की सन्मान नाही. हुंडा घेणारे एकप्रकारे आपल्या पोराला एकप्रकारे पैसे घेऊन विकून टाकतात. जनावरांची खरेदी विक्री होते पण मुलाचा बाप प्रतिष्ठेच्या खोट्या कारणासाठी म्हणा किंवा लोभपोटी म्हणा आपल्या पोराला विकून टाकतो.*
मुली कडच्यांची हुंडा द्यायचा आणि मुलाकडच्यांनी तो लुटायचा / लाटायचा याचा अर्थ काय ? यात शहाणपणा कुठलाच नाही उलट गाढवपणा आहे .
शीतल ताईने आत्महत्या करण्या अगोदर जी चिठ्ठी लिहून ठेवली ती या खंडणी बहाद्दर व्यवस्थेला आणि सर्व मुलाच्या बापांना सवाल करून जाते की तुमचा धर्म , तुमचे विवाह संस्कार हे सगळं थोतांड आहे. धर्माच्या , विवाह संस्काराच्या नावाखाली जर मुलींवर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर त्या देशातील समाजव्यवस्थेची काय स्थिती असेल ? याचा विचार करून बघा .
*आणि कशाला आमची संस्कृती किती महान म्हणून सारखा दांडोरा पिटता ? काय आहे तुमची संस्कृती ? काय आहे तुमचा धर्म ? जगातील सर्वात लुच्चा धर्म हा तुमचा आहे.*
वैदिक व्यवस्थेच्या ठेकेदारांनो सर्वात नीच संस्कृती तुमची आहे. ज्या देशात संस्कार, धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली तुम्ही राजकारण करता तो देश सुसंस्कृत कसा? अण्णाभाऊ साठे म्हणाले होते स्वातंत्र्य हे कोणत्या गाढविणीचे नाव आहे ? मी थोडा त्यात बदल करून म्हणेल या देशातील धर्म आणि त्याचे धर्मगुरू , उघडे नागडे साधू हे खरे बदमाश आणि लफंगे आहे . या देशातील धर्म माणसाला माणूस म्हणून जगण्याची परवानगी देत नाही .
*माणसा-माणसात भेद करते . झगडे लावते . हा कसला धर्म ? हि कुठली संस्कृती ?*
या धर्मामुळे आणि त्यांच्या रिती-भातीमुळे शितलला आत्महत्या करावी लागली. हे सत्य आहे .
धर्माच्या ठेकेदारांना आणि संस्कृतीच्या पुजाऱ्यांना त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती किती नीच आहे हे बलिदान देण्यापूर्वी ठणकावून सांगितले आहे.
जोपर्यंत या देशातील स्त्रिया स्वतः रस्त्यावर उतरून या धर्मव्यवस्थे विरुद्ध आवाज उठवणार नाही .
*लग्नातून ब्राम्हण-भटजी आणि त्यांची व्यवस्था हद्दपार करणार नाही तोपर्यंत या देशातील स्त्री स्वतंत्र होणार नाही.*
तिच्याकडे माणूस म्हणून बघितले जाणार नाही . हे जर झाले नाही तर अश्या हजारो -लाखो शीतल आत्महत्या केल्यावाचून राहणार नाहीत....
*स्त्रियांनी स्त्रियांच्या मानसिक-सांस्कृतिक-आर्थिक-धार्मिक स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे.*